अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती, पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

sadaiv atal

नवी दिल्ली वृत्तसंस्था । माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते अटल बिहारी वाजयपेयी यांची आज 5वी जयंती आहे. या निमित्ताने देशातील अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी दिल्ली येथील ‘सदैव अटल स्मार’ येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांनी माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली.

देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीतील त्यांच्या ‘सदैव अटल’ या स्मृतीस्थळावर जाऊन सकाळी अनेक दिग्गज नेत्यांनी अटलजींना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. दरम्यान, प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा यांच्या भजनांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. वाजपेयींना अभिवादन करण्यासाठी जमलेल्यांमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह विविध पक्षीय नेत्यांनी हजेरी लावली होती.

Protected Content