जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात महात्मा गांधी जयंती निमित्त गांधी टेकडीवर झालेल्या “भजन प्रभात” या कार्यक्रमात सादर झालेल्या भजनांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली. याच कार्यक्रमात भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना देखील वंदन करण्यात आले.
विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळेअंतर्गत महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्राच्यावतीने सोमवार दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी गांधी टेकडीवर संगीत विभागाच्यावतीने भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. रघुपती राघव राजाराम, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, पायोजी मैने राम रतन धन पायो, वैष्णव जन तो तेने कहीये, गुरु गोविंद दोऊ खडे, कौसल्याचा राम या भजनांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली.
महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या नंतर विद्यापीठाच्या समाज कार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी “नशा मुक्त भारत” या विषयावर पथनाट्य सादर केले. यावेळी महात्गा गांधी यांच्या प्रतिमेचा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला तेथे कुलगुरुं समवेत विद्यार्थ्यांनी सेल्फी घेतल्या. या कार्यक्रमास कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, विचारधारा प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा.म.सु.पगारे, महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्राचे प्रभारी संचालक डॉ.उमेश गोगडीया, प्रा.राम भावसार, प्रा.सचिन नांद्रे, प्रा.के.एफ.पवार, डॉ.दीपक सोनवणे, आदी उपस्थित होते.
संगीत विभागाचे प्रा. प्रिया महाले, प्रा.तेजस मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकेश शिंपी, सुकन्या जाधव, माधुरी महाजन, राखी शेंडगे, पोर्णिमा शेंडगे, शुभम जैन यांनी भजन सादर केले. प्रा. विजय घोरपडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले. सुरुवातीस राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा.सचिन नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयोच्या विद्यार्थ्यांनी “फ्रिडम फिट इंडिया ४.०” ही दौड आयोजित केली. यावेळी कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून दौड प्रारंभ करण्यात आली. या दौड मध्ये रासेयोच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.