अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । अमळनेर शहरासह तालुक्यात शुक्रवारी सायंकाळनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे काही काळ परिसरात गारवा निर्माण झाल्याने ग्रामस्थांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
त्यात मांडळ येथे सुमारे 25 मिनिटे पाऊस झाला यामुळे शेतात काही ठिकाणी पावसाचे पाणी साचलं असल्याचे दिसून आले.तर दुसरीकडे बोरी नदी काठावरील गावांमध्ये तर तब्बल दीड तास मुसळधार पाऊस व काही ठिकाणी मध्यम स्वरूपात गारपीट देखील झाली. वादळी वाऱ्यामुळे रंजाणे, अंतुर्ली तासखेडा सह परिसरात तसेच तालुक्यात बहुतांश ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. कळमसरेसह परिसरातील शहापूर तांदली निम पाडळसरे, धार मारवाड डांगरी सात्रि गोवर्धन या गावांमध्ये देखील वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने लोकांची चांगलीच दमछाक झाली होती.