भुसावळ प्रतिनिधी । शहरात आज सकाळी पाच वाजेपासून पावसाने अचानक हजेरी लावली. बेमोसम पाऊस झाल्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे.
आज अचानक झालेल्या पावसामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच धावपळ पाहायला मिळाली. सकाळपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे. बेमोसम पावसामुळे वातावरणामध्ये बदल झाल्याने सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. सरकारी दवाखाना तसेच खाजगी दवाखान्यात रुग्ण उपचार घेत असल्याचे दिसत आहे. तसेच बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.