यावल शहरासह तालुक्यात पावसाची हजेरी; उकाडापासून मिळाला दिलासा

यावल लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यात रविवारी रात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पाउसाची हजेरी पाऊसाची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी व तापमानामुळे हैराण झालेल्या नागरीकांना उकाडयापासुन त्रस्त झालेल्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

लयावल तालुक्यात ९ जुन रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास सुमारे १ तास विजेच्या कडकडाट वादळी वाऱ्यासह पाऊसाने हजेरी लावली यात तालुक्यातील यावल ८७ ल.३ मिली मिटर, फैजपुर ५२ मिली मिटर, भालोद येथे ४२.६मिली मिटर , बामणोद ४९.२ मिली मिटर, साकळी २७.५ मिली मिटर आणी किनगाव येथे २८.९मिली मिटर अशा प्रकारे एकुण २८७.५ मिली मिटरच्या सरासरीने ४७.९२ मिली मिटर व ५४.६ मिली मिटर इतक्या पाऊसाची नोंद करण्यात आली असल्याची माहिती महसुलच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सुत्रांकडून देण्यात आली आहे. यावल परिसरात ८७.३मिली मिटर अशी सर्वाधिक पाऊस परिसरात झाल्याची नोंद करण्यात आली आहे ल.

दरम्यान शेतकऱ्यांनी ज्या ठीकाणी ८० ते १oo मिली मिटरच्या आत पाऊसाची नोंद झाली असेल त्या ठिकाणीचे शेती क्षेत्र हे पेरणीसाठी पोषक व अनुकुल असल्याची माहिती यावल तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांनी दिली आहे.

Protected Content