जळगाव, प्रतिनिधी | मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली असून, जळगाव शहर मतदारसंघांची मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या गोदामात होणार आहे. येथे सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांसह सीआयएफएसचे जवान तैनात आहेत. मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी दीपमाला चौरे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील मतमोजणी उद्या गुरुवार २४ ऑक्टोबर रोजी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे. सकाळी ८ वाजता सर्वप्रथम पोस्टल मतमोजणीने सुरवात होणार असून त्यानंतर मतदान केंद्रनिहाय ईव्हीएमची मतमोजणी करण्यात येणार आहे. जळगाव शहर मतदारसंघाच्या मतमोजणी संदर्भात उपविभागीय अधिकारी दीपमाला चौरे यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ ला माहिती देतांना सांगितले की, जळगाव शहर मतदारसंघात ३९४ मतदार केंद्र असून २९ फेऱ्या होणार आहेत. फेरीनिहाय मतमोजणीला सकाळी ८ वाजेपासून सुरुवात होईल. प्रथम टपली मतपत्रिका मोजल्या जातील यात ४२३ टपली मतपत्रिका व ३९ इटीपीपीएस बेसच्या मतपत्रिका आलेल्या आहेत. यांची मतमोजणी सुरु झाल्यानंतर इव्हीएमची मतमोजणी सुरु होणार आहे. सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून कोणालाही मोबाईल किंवा इतर गोष्टी आणण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. केवळ आरओ व सुपरवायझर यांना मोबाईल वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी त्यांची सुरक्षा व्यवस्था पूर्ण केली आहे. उद्या केवळ मतमोजणी कर्मचारी व उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना मतमोजणीसाठी आत सोडण्यात येणार आहे. इतरांना बाहेर निकाल कळावा यासाठी माईकची व्यवस्था केली असल्याचेही चौरे यांनी सांगितले.
विधानसभा क्षेत्रनिहाय मतमोजणी होणार असलेल्या फेऱ्या– चोपडा विधानसभा मतदार संघ २३ फेऱ्या, रावेर २२ फेऱ्या, भुसावळ २२ फेऱ्या, जळगाव शहर २९ फेऱ्या, जळगाव ग्रामीण २३ फेऱ्या, अमळनेर २३ फेऱ्या, एरंडोल २१ फेऱ्या, चाळीसगाव २४ फेऱ्या, पाचोरा २३ फेऱ्या, जामनेर २३ फेऱ्या, मुक्ताईनगर २३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होणार आहे.
मतमोजणीची ठिकाणे
* चोपडा- महाराष्ट्र वखार महामंडळ, गोडवून क्रमांक २, चोपडा,
* रावेर – नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, रावेर
* भुसावळ- प्रशासकीय इमार, प्रभाकर हॉलसमोर, भुसावळ,
* जळगाव शहर- महाराष्ट्र वखार महामंडळाचे गोडवून क्रमांक २६, जळगाव,
* जळगाव ग्रामीण- महाराष्ट्र वखार महामंडळ, गोडवून क्रमांक २, धरणगाव,
* अमळनेर- छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, प्रताप कॉलेज, अमळनेर
* एरंडोल- डीडीएसपी कॉलेज, तरणतलावाजवळ, म्हसावद रोड, एरंडोल,
* चाळीसगाव- वायएन चव्हाण महाविद्यालय, हिरापूर रोड, चाळीसगाव,
* पाचोरा-गिरणाई क्रेडिट सोसायटी गोडावून क्रमांक ३, मोंढाळा रोड, पाचोरा,
* जामनेर- शासकीय खाद्यनिगम गोडवून क्रमांक ३, मार्केट कमिटीच्या पश्चिम बाजूला, जामनेर,
* मुक्ताईनगर-श्री संत मुक्ताबाई महाविद्यालय इनडोअर स्टेडियम, मुक्ताईनगर.