Home धर्म-समाज भुसावळ शहर पत्रकार संस्थेच्या अध्यक्षपदी प्रेम परदेशी

भुसावळ शहर पत्रकार संस्थेच्या अध्यक्षपदी प्रेम परदेशी

0
44

भुसावळ प्रतिनिधी । येथील शहर पत्रकार संस्थेची बैठक विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत संस्थेच्या अध्यक्षपदी दैनिक देशोन्नतीचे भुसावळ विभागीय कार्यालय प्रमुख प्रेम परदेशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन पत्रकारदिनी आयोजित कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

बैठकीला बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार तथा सरकारी वकील अॅड . नितीन खरे तर प्रमुख उपस्थिती संजयसिंग चव्हाण, प्रा. श्रीकांत जोशी यांची होती . यावेळी जनशक्ती चे संपादक  कुंदन ढाके, पत्रकार सत्तार शेख यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

बैठकीला उज्वला बागुल, राजेश पोतदार, प्रकाश तायडे, संजय काशिव, परशुराम बोंडे, डॉ. जगदीश पाटील, कलीम पायलट, सद्दाम खाटीक, अभिजीत आढाव, सुनील आराक, इम्तियाज शेख, हबीब चव्हाण, कैलास उपाध्याय, कालू शाह, सतीश कांबळे, किशोर शिंपी, आशिष पाटील, शंतनु गचके, राजेश तायडे, अॅड. कैलास शेळके उपस्थित होते. भुसावळ शहर पत्रकार संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडीबद्दल प्रेम परदेशी यांचे अभिनंदन करण्यात येऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पत्रकारांसाठी आरोग्य विमा, पत्रकार भवन दुरुस्ती, सभासद नोंदणी, गृहनिर्माण सोसायटी तसेच पत्रकारदिनाचा कार्यक्रम याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. सुनील यांनी आभार मानले. भुसावळ शहर पत्रकार संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रेम परदेशी हे भुसावळ शहर पत्रकार संस्थेची कार्यकारिणी पत्रकारदिनी जाहीर करणार आहेत. सुनील आराक यांनी आभार मानले.

 


Protected Content

Play sound