यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील तहसील कार्यालयात महसुल प्रशासनाच्या वतीने मान्सुनपुर्व आढावा घेण्या संदर्भात काल दिनांक २९ मे बुधवार रोजी तहसील कार्यालय यावल येथे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस तहसीलदार यांनी तालुक्यातील सर्व शासकीय विभागांना त्यांनी मान्सुनपुर्व दक्षता घेण्याच्या व आपआपल्या विभागाअंतर्गत करावयाचे कामकाजा बाबतच्या सूचना दिलेली आहे. दरम्यान नगरपरिषरेला शहरातील नाले आणि गटारी साफ करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.
महावितरण कंपनीला पावसाळयात वेळोवेळी झाडे पडून व वादळी वाऱ्याने विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास नागरीकांची गैरसोय होवुया दृष्टीकोणातुन काळजीपुर्वक तात्काळ वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे यावल सार्वजनिक बांधकाम विभागास पावसामुळे विविध ग्रामीण क्षेत्रांना जोडणारे पूल रस्ते यांचे काही नुकसान झाल्यास त्याची तात्काळ दुरुस्ती होणे बाबत सूचना दिलेल्या आहेत.तसेच कृषी आणि महसूल विभागाला पिकांच्या होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे वेळोवेळी तात्काळ प्रभावाने करावयाच्या सूचना दिलेल्या आहेत. हतनूर व तालुक्यातील आदी ठिकाणच्या इरिगेशन विभागाला अतिवृष्टी झाल्यास धरणातील वाढणाऱ्या पाण्याचा फ्लोची सूचना वेळोवेळी देण्याबाबत व वड्री धरण, मोर धरण, निंबादेवी धरण, मनुदेवी धरण येथील पाण्याचा प्रवाह याबाबत कार्यालयास वेळोवेळी तातडीने अपडेट देण्याबाबत कळवले आहे.
वन विभागाला देखील पावसामुळे रस्त्यावर पडलेली झाडे कट करून रस्ता मोकळा करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आलेले आहे. तसेच जर कुठे आपत्ती आलीच आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची वेळ आली तर त्याकरिता पर्यायी व्यवस्था करून ठेवण्यात आलेले आहेत. या मान्सुन पुर्व आढावा बैठकीस निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, तालुका कृषी अधिकारी भरत वारे, सहाय्यक पोलीस निरिक्षक हरिष भोये, वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल भिलावे, यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ लिपीक विकास जंजाळे यांच्यासह आदी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते .