
0aa5d160 4f59 4218 9132 3bf4a52f9996
याबाबत वृत्त असे की, गत महिनाभरापासुन गलवाडे या गावातील अत्यंत सर्व सामान्य कुटुंबातील प्रथमेश या नावाचा मुलाला पानथरी या आजाराने ग्रासले होते. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून त्याला वेळोवेळी उपचार भेटत नव्हता. तब्येत खूप जास्त सिरियस होवायला लागली तेव्हा त्याचा वडिलांनी त्याला पुण्याला दवाखान्यात दाखल केले. प्रस्तुत प्रतिनिधी पत्रकार ईश्वर महाजन यांनी लाईव ट्रेंड न्युजचे कार्यकारी संपादक विजय वाघमारे सरांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. त्यांनी लगेच होकार देऊन आपल्या वतीने मोठ्या प्रमाणावर सहकार्य करून बातमी राज्याच्या कानाकोपर्यात पोहचली. यामुळे त्याच्या कुटुंबियांकडे मदतीचा ओघ सुरू झाला. पण नियतीला ते मान्य नसावे. शेवटी प्रथमेशने उपचार सुरू असतांनाच शेवटचा श्वास घेतला. लाईव्ह ट्रेंडस् न्यूजच्या वृत्तामुळे समाजातील अनेक दाते समोर आले. मात्र अखेर नियतीसमोर सर्व जण हरले. प्रथमेशच्या मृत्युमळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.