नाशिक/अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौर्यात संत सखाराम देवस्थानाचे गादीपती प्रसाद महाराज यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.
नरेंद्र मोदी यांचा नाशिक येथील दौरा शुक्रवार दिनांक १२ जानेवारी रोजी उत्साहात पार पडला. यात पंतप्रधानांनी युवा महोत्सवाच्या उदघाटन सत्रात हजेरी लावतांनाच काळाराम मंदिरात पूजा-अर्चना केली.
दरम्यान, काळाराम मंदिरातील कार्यक्रमासाठी अमळनेर येथील प.पू. संत सखाराम महाराज देवस्थानाचे गादीपती हभप प्रसाद महाराज अमळनेरकर यांना देखील निमंत्रण देण्यात आले होते.