मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे. प्रकाश आंबेडकरांनी २४ मार्च रोजी आज आपली उमेदवारी जाहीर केली आहे. आंबेडकर हे अकोला मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरणार आहे. २७ मार्चला ते आपला उमेदवारी अर्ज भरतील आणि २६ मार्च रोजी आपली भूमिका जाहीर करतील अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदते दिली. आम्ही चार जागांवर ठाम आहोत.
काही मतदारसंघात मतभेद दिसून येत आहेत. काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पंरतु ज्या मतभेदाच्या जागा आहेत ते जाहीर केलेले नाहीत. महाविकास आघाडीत त्याच्यामध्ये काही मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे. तर शिवसेनेने त्याबाबत आक्षेप घेतलेला नाही. येत्या एक ते दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल. ते चित्र स्पष्ट झालं की ते आमच्यासोबत चर्चा करायला तयार असतील तर आम्ही देखील त्यांच्यासोबत बसायला तयार आहे असे यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले.