Home Cities अमळनेर मालपुर ग्रामपंचायतीवर प्रफुल पाटील यांचे वर्चस्व

मालपुर ग्रामपंचायतीवर प्रफुल पाटील यांचे वर्चस्व


 

 

 

 

 

c9e5cb73 4a9d 4e54 8f49 fed2ed60665b

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मालपुर येथील ग्रामपंचायतीची निवडणूक मोठी चुरशीची झाली. त्याठिकाणी लोकनियुक्त सरपंच तसेच सात सदस्य म्हणून ‘आपले गाव आपले पॅनल’च्या सर्व सदस्यांना निवडून आणण्यात येथील बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रफुल पवार यांनी पुन्हा बाजी मारून पाच वर्षे सत्ता राखण्यात यश मिळवले आहे.

लोकनियुक्त सरपंच म्हणून सुमनबाई पंढरीनाथ व सदस्य म्हणून प्रफुल्ल हिरालाल पवार, सचिन भिमराव पवार, जतनबाई दशरथ पाटील, उज्वलाबाई प्रवीण पाटील, रेखाबाई संजय पाटील, दमयंताबाई यशवंत पाटील, रोहिदास भगवान भिल, या सर्व सरपंचसह सदस्यांनी मोठ्या फरकाने विजय खेचुन आणला. या विजयात विधान परिषदेच्या आ.स्मिताताई वाघ व भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. प्रफुल्ल पवार यांनी मागील १० वर्षांपासून गावात जी विकास कामे केली, त्याचा त्यांना निवडणुकीत मोठा फायदा झाला आहे. या विजयाबद्दल जि.प. माजी सदस्य अॅड.व्ही.आर. पाटील, प.स. सदस्य भिकेश पाटील, प.स. माजी सभापती शाम आहिरे, ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र बोरसे, पाडळसे माजी सरपंच सचिन पाटील आदींसह ग्रामस्थांनी त्यांचे व नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound