जळगाव प्रतिनिधी । राज्याचे एटीएस प्रमुख शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत अपशब्द वापरणारे, राष्ट्रपिता गांधी यांना मारेकऱ्यांना देशभक्त म्हणणाऱ्या प्रज्ञा ठाकूर यांची जामीन रद्द करावी अशी मागणी जळगाव शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी गाडीलकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निेवेदनात म्हटले आहे की, प्रज्ञा ठाकूर हीने मागे महाराष्ट्र राज्याचे एटीएस प्रमुख शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत अपशब्द वापरले होते व नंतर माफी मागितली म्हणून भारतवासीयांनी माफ केले, परंतु आता प्रज्ञा ठाकूर यांची हिम्मत वाढत असून त्यांनी आमचे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मारेकर्याला देशभक्त म्हणून एक प्रकारे आमच्या राष्ट्रपिताचा अपमान केलेला आहे, अशा या प्रज्ञा ठाकूरच्या या वक्तव्यावर शासनाने त्वरित कायदेशीर कारवाई करावी व माननीय न्यायालयाने त्यांना प्रकृती अस्वस्थतेच्या कारणामुळे आंतकवादी कारवायात प्रत्यक्ष गुंतलेली असताना सुद्धा जामीन दिलेला आहे. प्रज्ञा ठाकूर वर त्वरित कारवाई न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून प्रज्ञा ठाकूर वर त्वरित कायदेशीर कारवाई करावी. अशा या संशयित आंतकवाद्यांची जामीन रद्द करण्याची मागणी आज जळगाव शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी गाडीलकर यांच्या माध्यमाने शासना कडे केलेली आहे.
निवेदन देतांना यांची होती उपस्थिती
सदरचे निवेदन महिला संघटनेच्या श्रीमती मंगला सोनवणे यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांना दिले त्यावेळी जळगाव जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, अल्पसंख्यांक संघाचे प्रदेश अध्यक्ष जहांगीर खान, मुस्लिम ओबीसी संघटनेचे अश्फाक पिंजारी, एमआयएमचे शहराध्यक्ष रय्यान जागीरदार व समन्वयक रऊफ खान, ईदगाह ट्रस्टचे सहसचिव अनिस शाह, अकसा एज्युकेशनचे ताहेर शेख, जन नायक फाउंडेशनचे फरीद खान फीरोज पिंजारी, हारून पिंजारी यांची उपस्थिती होती.