Home Cities भुसावळ प्रधानमंत्री किसान सन्मान पात्र लाभार्थींची संख्या तहसील कार्यालयात कळवा

प्रधानमंत्री किसान सन्मान पात्र लाभार्थींची संख्या तहसील कार्यालयात कळवा

0
24
modi kisan yojana
modi kisan yojana

modi kisan yojana

भुसावळ प्रतिनिधी । येथील सर्व तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक उपरोक्त शासनाकडील पत्राच्या अनुषंगाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी सर्व शेतकरी कुटुंबे पात्र असून, लाभार्थींनी (दि.6 जुलै) ते (दि.7 जुलै) पर्यंत गोळा करून पोर्टल वर अपलोड करण्यासाठी सोमवार (दि. 8 जुलै) रोजी सायंकाळी ठीक 4 वाजता तहसील कार्यालयात उपलब्ध करावा.

याबाबत माहिती अशी की, सयुंक्त किंवा सामाईक खात्यातील व्यक्ती प्रत्यक्ष जमीन कसत असल्यास व्यक्तीचे कुटुंब योजनेच्या लाभासाठी पात्र ठरते. त्यामुळे सामाईक खात्यातील समाविष्ट व्यक्तीच्या बाबतीत उपरोक्त बाबीची खात्री करून क्षेत्रीय स्तरावरील गावनिहाय नियुक्त पालक अधिकारी किंवा कर्मचारी यांनी पात्र लाभार्थ्यांची संख्या तहसील कार्यालय बोदवड किंवा आपल्या व्हॉटस्अप ग्रूप वर तात्काळ कळवावी.


Protected Content

Play sound