कर्नाटक सरकार संकटात; काँग्रेस, जेडीएस आमदारांचे राजीनामासत्र

hd kumarswami

बंगळुरू वृत्तसंस्था । काठावर बहुमत असणार्‍या येथील काँग्रेस-जेडीएस आघाडीला आज आमदारांच्या राजीनामाअस्त्राने जोरदार हादरा बसला आहे. यामुळे कुमारस्वामी यांचे सरकार संकटात आले आहे.

एचडी कुमारस्वामी यांचे सरकार पहिल्यापासूनच कसेबसे राज्य कारभार हाकत असल्याचे दिसून आले आहे. कधीपासूनच काँग्रेस आणि जेडीएसचे काही आमदार फोडून भाजप सत्तारूढ होणार असल्याची चर्चा सुरू होती. विशेष करून लोकसभा निवडणुकीतील दणदणीत यशानंतर कर्नाटकातही सत्तांतर अटळ असल्याचे मानले जात होते. या पार्श्‍वभुमिवर, आज सकाळी काँग्रेसचे आठ तर जेडीएसच्या तीन आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी केल्याने खळबळ उडाली आहे. तर अजून काही आमदार राजीनाम्याच्या तयारीत असून एकूण १५ आमदार राजीनामा देणार असल्याचे वृत्त आहे. राजीनामा दिल्यानंतर हे सर्व आमदार भाजपमध्ये प्रवेश करून पुन्हा विधानसभेत निवडून येतील असे मानले जात आहे. दरम्यान, अद्यापही या आमदारांचे राजीनामे स्वीकारण्यात आले नसले तरी या सर्व घडामोडींमुळे कर्नाटक सरकार संकटात आल्याचे मानले जात आहे.

Protected Content