बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना ही प्रत्येक वीज ग्राहक व नागरिकांकरता लाभदायक असून आपल्या गरजेनुसार वापरानुसार आपण सोलर पॅनल लावून सरकारच्यावतीने दिली जाणारी सबसिडीचा लाभ घेत भरमसाठ येणारे वीज बिल शून्य करू शकतो आणि त्याकरता प्रत्येक वीज ग्राहकाने या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घ्यावा त्याकरता मोठ्या प्रमाणात वीज वितरण कंपनीच्या वतीने जनजागृती लोकांपर्यंत संपूर्ण माहिती देण्याकरिता घरोघरी जाऊन प्रत्येक विभागात जाऊन मोठे अभियान राबवण्यास सुरुवात केली.
या अनुषंगाने आज बुलढाणा जिल्ह्यातील सागवान येथे बजरंगनगर भागातील नागरिकांशी थेट संवाद साधण्याकरता ऑन द फिल्ड बुलढाणा वीज वितरण चे अध्यक्ष अभियंता सुरेंद्र कटके यांनी संवाद साधत त्यांच्या मनातल्या सूचना व असलेल्या अडचणी जाणून घेत कशा पद्धतीने आपण दैनंदिन जीवनात सोलर ऊर्जेच्या माध्यमातून आपल्या घरावर वीज निर्मिती करून आपले वीज बिल शून्य करू शकतो व दैनंदिन त्याचा वापर देखील आपण मुबलक करू शकतो याकरिता त्यांनी थेट संवाद साधला.
एकंदरीत दिवसेंदिवस प्रत्येक वीज ग्राहकाला विज ही गरजेची झाली आहे वाढते वीज बिल वाढते दर आणि त्यातून कायमस्वरूपी सुटका होण्याकरिता व आपण अतिरिक्त निर्माण केलेली ऊर्जा ही वीज वितरण स्वतः विकत घेत आपल्याला वीज वितरणची वापरलेल्या बिलात समायोजित करून देते त्याकरिता लहान ग्राहकांपासून तर सर्वात जास्त औद्योगिक ग्राहकांपर्यंत याचा, या योजनेचा लाभ घेण्याकरिता प्रत्येकाला हितकारी आहे असे म्हटलं तर वाव ठरणार नाही.