संगीतमय कथेत प्रभू श्रीराम जन्मोत्सव साजरा

faizpur shriram katha

फैजपूर प्रतिनिधी । येथील खंडोबा वाडी देवस्थानात गुरुपौर्णिमा व महंत घनश्याम दासजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ९ दिवसांच्या संगितमय श्रीराम कथेच्या चौथ्या दिवसाच्या प्रयोजनामध्ये प्रभू श्रीरामांचा जन्म दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला.

कथाकार पंडित अजय भार्गव (मानसमणि) यांनी चार चार प्रकटें ललनवा- अवध में हे अभिनंदन पर गीत गाऊन उपस्थित हजारो श्रोत्यांना ताल धरण्यास भाग पाडले. अत्यानंदित होऊन सर्व श्रोत्यांनी एकमेकांना अभिनंदन करत प्रभू श्रीरामांचा जन्म मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला. खंडोबा देवस्थानाचे गादिपती महामंडलेश्‍वर श्री पुरुषोत्तम दासजी महाराज यांच्या कृपेमुळे श्रीराम कथेचे मुख्य यजमान श्री धनराज नारखेडे आणि श्री अरुण होले हे सपत्नीक व सह परिवारासोबत पूजन करून हजारो भक्त व श्रोतागण धन्य झाले. महाराजांनी रामायणातील काव्यपंक्ती गाऊन संदेश दिला की जेव्हा जेव्हा धर्माचा र्‍हास होईल तेव्हा हिंसा व असुरांचा प्रभाव वाढेल. धर्माच्या हिनामुळे राक्षसी वृत्ती वाढेल, आतंकवादचोरी,लुटमार,अपहरण आदी गोष्टी वाढल्यामुळे पृथ्वी व्याकुळ होईल. जसे की त्रेतायुगामध्ये लंकापती रावणाचे अत्याचार वाढत गेले. तेव्हा आयोध्येमध्ये महाराज दशरथ व राणी कौशल्या मातेकडे प्रभू श्रीरामांनी जन्म घेतला. श्रीरामाच्या जन्माच्या भूमिकेत सजीव देखाव्यात ललित दिनकर नारखेडे यांचे एक वर्षीय चिरंजीव कार्तिक होता.

कथेची समाप्ती भंडारा व संत संम्मेलनाने २५ जुलैला होणार आहे. दरम्यान, या कथेमध्ये महाआरतीचा माजी आमदार शिरीष चौधरी, मसाका चेरमन शरद महाजन फैजपूर शहरातील सर्व डॉक्टर ,माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांच्यासह मान्यवरांची उपस्थित होती. भाविक भक्त गण कथेमध्ये तलीन झाले होते.

Protected Content