प्रा.वा.ना. आंधळे यांची कविता मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

5a8c2880 c8ab 478a af64 8516ab6bd229

एरंडोल (प्रतिनिधी) खान्देशातील सुप्रसिद्ध गझलकार प्रा.वा.ना. आंधळे यांची आईविषयी कृतज्ञ भावना नोंदवणारी ‘भोग’ ही कविता मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बी.ए. च्या प्रथम वर्षासाठी समाविष्ट करण्यात आली आहे.

 

साडेतीन दशकांपासून काव्यलेखन करणाऱ्या प्राध्यापक आंधळे यांच्या कविता यापूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अभ्यासक्रमात तसेच बालभारती, या क्रमिक पुस्तकात समाविष्ट झाल्या आहेत. त्यांच्या ‘फर्मान’ या काव्यसंग्रहाचे इंग्रजी भाषेत भाषांतर झाले असून याच संग्रहावर महाराष्ट्रातल्या नामवंत ४० समीक्षकांनी समीक्षा लेखन केले आहे. फर्मान आणि इतर कविता आशय आणि आस्वाद या शीर्षकाने समीक्षाग्रंथ काशीद आला आहे. त्यांच्या या वाटचालीबद्दल शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Protected Content