जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील इच्छादेवी चौक ते डीमार्टपर्यंतच्या रस्त्याच्या दरम्यान राहणारे स्थानिक रहिवाशी आणि दुकानदार यांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दुकाने गटारीपासून सात फूट आत असलेले घरे व दुकाने काढण्याच्या निर्णयाला स्थगित द्यावी अशी मागणी स्थानिक रहीवाशी आणि दुकानदार यांनी विरोधी गटनेते सुनिल महाजन यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इच्छादेवी चौक ते शिरसोली नाकापर्यंत शिरसोलीरोड वरील घरमालकांना व व्यवसायिकांना जळगाव महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी २१ सप्टेंबर रोजी तोंडी सांगून गटारीपासून आत सात फूटमध्ये असलेले घरे आणि दुकाने काढून घ्या अन्यथा महापालिका अतिक्रमण विभागातर्फे कारवाई करत ही घरे आणि दुकाने काढण्यात येईल असे सांगण्यात आले होते. दरम्यान, दरम्यान या परिसरात राहणारे रहिवासी व दुकानदार यांनी आज बुधवार २२ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता महापालिकेत विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांची भेट घेऊन अतिक्रमण निर्णयाला स्थगिती मिळावी अशी मागणी करत निवेदन देण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, सर्वजण जवळपास 50 ते 60 वर्षापासून या ठिकाणी राहत असून व्यवसाय करत आहे. ज्या जागेवर आता हे त्या घराची घरपट्टी व इतर कर महापालिकेला वेळोवेळी भरला जात आहे. दरम्यान रोडवरील गटारीच्या आत असलेली घरे आणि दुकाने असून ती अतिक्रमित राहू शकत नाही. आम्ही इतक्या वर्षापासून राहत आहे. रस्त्याचा वाद हा महानगरपालिकाचाआहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान दिवाळी व दसराच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण काढण्याचा निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी स्थानिक रहिवासी व्यवसायिकांनी केलेला आहे.