Home राजकीय हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता : ३ डिसेंबरच्या बैठकीकडे लक्ष

हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता : ३ डिसेंबरच्या बैठकीकडे लक्ष

0
30

मुंबई । राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणारे हिवाळी अधिवेशन हे पुढे ढकलले जाण्याची शक्यता असून या संदर्भात ३ डिसेंबर रोजी होणार्‍या बैठकीत निर्णय होण्याचे संकेत मिळाले आहेत.

दरवर्षी नागपूरला होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. अधिवेशन मुंबईत कधीपासून घ्यायचे याचा निर्णय घेण्यासाठीची बैठक ३ डिसेंबरला होणार आहे.

संसदेचे अधिवेशन कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रद्द करण्यात आले. मुंबईतील अधिवेशनही रद्द होणार अशी चर्चा पाठोपाठ सुरू झाली. मात्र, निदान चार दिवसांचे तरी अधिवेशन घ्यावे असा विचार सुरू आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग अद्याप आटोक्यात येत नसल्याचे आणि रूग्ण संख्या पुन्हा वाढीस लागल्याने हे अधिवेशन पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता देखील आहे.


Protected Content

Play sound