शिष्यवृत्ती परीक्षेत  धरणगावचे विद्यार्थी चमकले  गुणवत्ता यादीत

 

धरणगाव, प्रतिनिधी । येथील बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयाचे इयत्ता ५ वी चे तीघ व इयत्ता ८ वी च्या दोघांनी शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत स्थान पटकविले आहे

धनश्री कांतीलाल पाटील, कल्पेश नंदकिशोर जाधव, योगिता पुरुषोत्तम पाटील यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान पटकविले आहे. तसेच इयत्ता आठवी मधून शहरी सर्वसाधारण मधून राधिका प्रमोद राजपूत, सुमेध प्रमोद गाढे हे देखील गुणवत्ता यादीत चमकले आहेत.

शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ५वीची धनश्री पाटील हिने २५५ पैकी १४५, कल्पेश जाधव याने २५५ पैकी १५३ तसेच योगिता पाटील हिने २५५ पैकी २१३ गुण प्राप्त करून शहरी सर्वसाधारण मधून गुणवत्ता यादीत स्थान पटकविले आहे. इयत्ता ८ वीतून राधिका राजपूत हिने २०९ पैकी ६५ व सुमेध गाढे याने २०९ पैकी १२३ गुण मिळवून गुणवत्ता यादीत चमकले. त्यांच्या यशाबद्दलसंस्थेचे अध्यक्ष हेमलालशेठ भाटिया,उपाध्यक्ष अंकुश पाटील, सचिव प्रा.रमेश महाजन,सर्व संचालक मंडळ, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक विक्रमादित्य पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस. एस. पाटील, सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. त्यांना त्यांच्या वर्गशिक्षकांनी मार्गदर्शन केले.

Protected Content