Home Cities जळगाव तरूणीला पाठविले अश्लिल मॅसेज

तरूणीला पाठविले अश्लिल मॅसेज


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एका तरुणीला इन्स्ट्राग्राम अश्लिल मेसेज पाठवून त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळातील २८ तरुणी एका खाजगी कंपनीत नोकरी करते. तिला ५ जून ते ८ जून दरम्यान अनोळखी व्यक्तीने कारण नसतांना इन्टाग्रामवर अश्लिल मेसेज पाठविले. अशा पध्दतीने वारंवार अश्लिल मेसेज पाठवून अनोळखी व्यक्ती त्रास देत असल्याने तरुणीने बुधवारी याबाबत सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन अश्लिल मेसेज पाठविणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे हे करीत आहेत.


Protected Content

Play sound