Home राष्ट्रीय अखेर पूजा पांडे गजाआड

अखेर पूजा पांडे गजाआड

0
30


अलीगड वृत्तसंस्था । महात्मा गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर गोळ्या झाडणारी हिंदू महासभेची पदाधिकारी पूजा पांडे हिला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी रोजी अलीगड येथे हिंदू महासभेतर्फे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला गोळ्या मारण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. या भ्याड कृत्याचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात आल्या होत्या. दरम्यान, याबाबत काँग्रेसने देशभर निदर्शनेदेखील केली होती. यानंतर तिच्याविरूध्द पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, अलीगड पोलिसांनी पूजा पांडे आणि तिचा पती अशोक पांडे यांना अटक केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound