Home Cities जळगाव जळगावात राजकीय भूकंप : दोन माजी महापौरांसह माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल !

जळगावात राजकीय भूकंप : दोन माजी महापौरांसह माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महापालिका निवडणूक तोंडावर असतांनाच दोन माजी महापौरांसह माजी नगरसेवकांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळाचे चर्चेला उधाण आले आहे. यामुळे शिवसेना-उबाठा गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना-उबाठा पक्षातील मातब्बर पदाधिकारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. गुरूवारी सायंकाळी हा प्रवेश होणार असल्याचे निश्चीत झाले होते. तथापि, जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या व्यस्ततेमुळे कालचा कार्यक्रम आज पार पडला. आज जी.एम. फाऊंडेशनमध्ये ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या उपस्थितीत माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी महापौर जयश्री महाजन, माजी विरोधी पक्षनेते तथा विद्यमान बाजार समिती सभापती सुनील महाजन आदींसह इतरांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. ना. गिरीशभाऊ महाजन यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रवेश सोहळ्याला खासदार स्मिताताई वाघ,आमदार राजूमामा भोळे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी,डॉ.केतकी पाटील आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून निघाला.

Protected Content

Play sound