पाटणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गेल्या अनेक दिवसापासून भाजपवर नाराज असणारे नितीश कुमार हे कॉंग्रेस व राजदसोबत सत्ता स्थापन करण्याची शक्यता दिसून आल्याने बिहारमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता निर्माण झाली आहे.
दिल्लीत काल झालेल्या निती आयोगाच्या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार अनुपस्थित होते. गेल्या तीन आठवडयांत केंद्र सरकारच्या अशा चौथ्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला नितीशकुमार गैरहजर राहिले आहेत. यातच त्यांनी आज आपल्या पक्षाची महत्वाची बैठक बोलावली आहे. रात्री उशीरा त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी संपर्क देखील साधल्याची माहिती समोर आली आहे.
नितीशकुमार यांचा संयुक्त दल व भाजप या मित्रपक्षांदरम्यान संबंध तणावाचे आहेत. यामुळे ते कॉंग्रेस व राष्ट्रीय जनता दल यांच्यासोबत मिळून सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. त्यांनी याआधी देखील अशा आघाडीच्या माध्यमातून सरकार चालविले होते. हाच पॅटर्न ते आता देखील राबवू शकतात.