Home क्राईम भांडण सोडवायला गेलेल्या पोलीसाला मारहाण

भांडण सोडवायला गेलेल्या पोलीसाला मारहाण


Crime l 3

जळगाव प्रतिनिधी । दोन भावांमध्ये बाचाबाची आणि शिवीगाळ सुरू असतांना गस्तावर असलेल्या पोलीसांनी हटकले असता त्यातील एकाने दगड मारून जखमी केल्याची घटना 25 एप्रिल रोजीच्या रात्री 1 वाजता घडली असून दोघांविरोधात शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, दिपक प्रकाश भोसले आणि मनोहर प्रकाश भोसले दोन्ही भाऊ असू रा. गेंदालाल मिल परीसर हे रात्री रेल्वे स्थानकाजवळी डॉ.आंबेडकर पुतळ्याजवळ एकमेकांना शिवीगाळ व बाचाबाची करत असतांना पोलीस कर्मचारी शेखर तडवी हे गस्तीवर असतांना दोघांना हटकले. याचा दोघांना राग आल्याने आरोपी दिपक भोसले यांने रस्त्यावर पडलेला दगड पोलीस कर्मचारी तडवी यांच्यावर फिरकावला. यात शेखर तडवी यांच्या डोक्याला लागल्याने जखमी झाले. शेखर तडवी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्थानकात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे करीत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound