बसस्थानक आवारात पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत पाकीट चोरी करणार्‍या संशयिताला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचार्‍याला महिलेसह एकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील डॉ. राहुल सांडू अग्रवाल (वय-२८) हे मंगळवारी १२ जुलै रोजी दुपारच्या सुमारास बसस्थानकातून त्यांच्या पाकीट चोरल्याची घटना घडली. त्यांनी जिल्हापेठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार गस्तीवर असलेले पोलीस नाईक जुबेर सिराज तडवी व अमित मराठे यांनी तात्काळ बसस्थानक गाठले. यावेळी एक अनोळखी इसम व महिला गर्दीचा फायदा घेवून प्रवाशांचे पाकीट लांबवित असल्याचे डॉ. अग्रवाल यांनी त्यांना सांगितले. त्यानुसार पोलीस कर्मचारी तडवी यांनी त्या इसमाची विचारपूस केली असता, त्याने तडवी यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात करीत त्यांना शिवीगाळ करु लागला. तडवी यांनी त्याला समजविण्याचा प्रयत्न करीत असतांनाच त्याच्यासोबत असलेली महिला ही पोलीस कर्मचारी जुबेर तडवी यांच्या अंगावर धावून आली. या झटापटीत जुबेर तडवी यांचा शर्ट फाटला.

 

पोलिस कर्मचारी तडवी यांनी घटनेची माहिती तात्काळ पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांना दिली. पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाली. मारहाण करणाऱ्यांना जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले. गणेश चंद्रकांत आठवले (वय-३२, रा. शिवाजी नगर, जळगाव) व सरला पितांबर ठाकूर (वय-२१, रा. विजयनगर, नाशिक) अशी दोघांची नावे चौकशीत समोर आले आहे.  दोघांनी डॉ. राहूल अग्रवाल यांच्या खिशातून पाकीट चोरले असून त्या ४ हजार ५०० रुपये चोरी झाले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक जुबेर तडवी यांच्या फिर्यादीवरून सायंकाळी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content