जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी. यासाठी शनिवार २७ एप्रिल रोजी सायंकाळी पावणे सात वाजता शहर पोलीस ठाणे येथून शहरातून जिल्हा पोलीस दलातर्फे रुटमार्च काढण्यात आला. यामध्ये पोलीस दलातील अधिकाऱ्यांसह बीएसएफचे जवान सहभागी झाले होते.
आगामी लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहे. यामध्ये जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यातील सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर हद्दपारीसह एमपीडीएतंर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच मतदान शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे रुटमार्च काढण्यात आला. शनिवारी २७ एप्रिल रोजी सायंकाळी पावणेसात वाजता शहर पोलीस ठाण्यातून सुरुवात झाली. त्यानंतर रुटमाार्च घाणेकर चौक, बळीराम पेठ, काट्या फाईल, शनिपेठ, भिलपुरा चौक, रथ चौक, सुभाष चौकमार्गे पुन्हा शहर पोलीस ठाण्यात तो समाप्त झाला.
यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्यासह क्युआरटी व बीएसएफची तुकडी सहभागी झाली होती.