यावल प्रतिनिधी । बकरी ईदच्या पूर्वसंध्येला तालुक्यातील साकळी गावातून पोलिसांनी रूट मार्च काढून हा सण घरीच साजरा करण्याचे आवाहन केले.
तालुक्यातील साकळी येथे बकरी ईदच्या पुर्वसंध्येला गावातील प्रमुख मार्गाने पोलीस पथसंचलन करण्यात आले. व सर्वधर्मीय नागरीकांना राष्ट्रीय एकात्मता शांतता राखणे संदर्भात सुचना देण्यात आल्यात. साकळी गाव हे मागील काही दिवसापासुन कोरोना विषाणूच्या वाढत्या रूग्णसंख्यने सध्या हॉट स्पॉट बनले आहे. दरम्यान तालुक्यात संवेदनशील म्हणुन साकळी गावाची ओळख असुन या दृष्टिकोणातुन पोलीस प्रशासनाच्या माध्यमातुन पोलीस निरिक्षक अरूण धनवडे आणी त्यांच्या पोलीस सहकार्यांनी गावातून रूट मार्च काढला. आपल्या गावाचा धार्मीक सलोखा कायम राखण्याचे व लॉकडाउन पार्श्वभूमीवर शासनाने लागु केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.