पाचोऱ्यात पोलिसांचा रुट मार्च

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील संवेदनशील भागात आज (दि.१६) रोजी दुपारी ३:३० ते ४:१५ वाजेदरम्यान रॅपिड ऍक्शन फोर्स व स्थानिक पोलीस स्टेशन मधील अधिकारी व अंमलदार तसेच होमगार्ड यांचा रूट मार्च काढण्यात आला आहे.

रूट मार्च रॅपिड ऍक्शन फोर्स कंपनीचे डेप्युटी कमांडन्ट शशिकांत राय, पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे, पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील, गणेश चौबे, गोपनीय विभागाचे पोलिस हेड कॉन्स्टेबल नितीन सुर्यवंशी, पोलिस कॉन्स्टेबल सुनिल पाटील, किशोर पाटील, वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील, सुनिल पाटील, पोलिस काॅन्स्टेबल प्रकाश जगताप, बापु महाजन, विजयसिंग पाटील यांचे उपस्थितीत घेण्यात आला.

पाचोरा शहरातील संवेदनशील भागाची, मिस्त्र वस्ती व जास्तीत जास्त गणपती स्थापना झालेल्या भागात रूट मार्च हा मानसिंग मैदान पाचोरा येथून सुरू करुन नगरपालिका चौक, हुसेनी चौक, मच्ची बाजार, आठवडे बाजार, सोनार गल्ली, मुल्लावाडा, जामनेर रोड, असा फिरुन परत मानसिंगा मैदान येथे संपविला आहे. सदर रूट मार्च मध्ये रॅपिड ऍक्शन फोर्सचे एक पोलीस निरीक्षक, ८ पोलीस अधिकारी, एकूण ८१ कर्मचारी तसेच २५ अंमलदार व ४० होमगार्ड उपस्थित होते.

 

Protected Content