भुसावळात पोलिसांचे पथ संचलन ( व्हिडीओ )

भुसावळ प्रतिनिधी । आगामी बकरी ईदच्या पार्श्‍वभूमिवर आज पोलीस दलातर्फे शहरातून पथ संचलन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू झालेला हा रूट मार्च ईदगाहपर्यंत काढण्यात आला. यात पोलीस, होमगार्डसह राज्य राखीव दलाच्या तुकडीचाही समावेश होता.

आगामी ईदुल अजहा(बकरी ईदच्या) पार्श्‍वभुमीवर आज दि.२९ जुलै बुधवार रोजी पोलीसांनी पोलीस पथकासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते रजा टॉवर चौक खडका रोड मार्गे ईदगाह पर्यंत जोरदार पथसंचलन करुन शक्ती प्रदर्शन केले. यात उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत,तालुक्याचे रामकृष्ण कुंभार आदी सहभागी होते. या रूट मार्चमध्ये पोलिसांसह होमगार्ड आणि राज्य राखीव दलाची तुकडी सहभागी झाली होती.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड म्हणाले कि,जगभरात कोरोना संसर्गाने हाहाकार माजविला असून त्यामुळे स्वच्छता व सोशल डिस्टंटींगचे शासनाचे आदेश आहेत त्याचे पालन करणे गरजेचे आहे. ईद दरम्यान जातिय सलोखा टिकवून ठेवावे व कुणाच्याही धार्मिक भावना भडकणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. सोशल मिडीयावर किंवा अन्य माध्यमातून कुणी दुरूपयोग केल्यास कडक कारवाई केली जाईल. यासाठी भुसावळ शहरात एसआरपीएफ अमरावतीची तुकडी,महिला व पुरूष आरसीपी,सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी,होमगार्ड तैनात राहणार असल्याचे राठोड यांनी स्पष्ट
केले.

खालील व्हिडीओत पहा पोलिसांच्या पथ संचलनाचा व्हिडीओ.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/646423055974332

Protected Content