जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनातर्फे यावर्षी 17441 जागांची महापोलीस भरती जाहीर करण्यात आलेली आहे. तसेच येणाऱ्या काळात सरळ सेवा,महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब,गट क व इतर परीक्षा देखील होणार आहेत.
यासाठी भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन द्वारा वाकोद येथे गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे .पंचक्रोशीतील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवक युवतींसाठी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच अभ्यासिका व ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या अंतर्गत शनिवार रविवारी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन वर्ग भरविले जात आहेत यात राज्यातील नामवंत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत.
या केंद्रअंतर्गत दिनांक 27 मे ते 5 जून दरम्यान विनामूल्य पोलीस भरती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर सराव परीक्षा सकाळी नऊ ते अकरा या वेळात गौराई कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न होणार आहे.सराव परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. सदर सराव परीक्षा 27 मे आणि एक ते चार जून या दरम्यान संपन्न होणार आहे. तरी अधिकाधिक युवक युवतींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी तसेच आपल्या नाव नोंदणीसाठी 7057446916 या भ्रमणध्वनी क्रमांकावर व्हाट्सअप द्वारे संपर्क साधावा.