जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पोलीस दक्षता नगरातील दोन घरातून दोन मोबाईल लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवार २१ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जितेंद्र राजेंद्र राजपूत (वय-२६) रा. दक्षता नगर, पोलीस लाईन, जळगाव हे आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. ते पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून नोकरीला आहे. २१ सप्टेंबर रोजी पहाटे ३ ते सकाळी ७ वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडा असतांनाचा फायदा घेत २० हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल चोरून नेल्याचे उघडकीला आले. यासंदर्भात जितेंद्र राजपूत यांनी मंगळवारी २१ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक सुवर्ण तायडे करीत आहे.