एनआयएची छापेमारी : जळगावातील एकाला अटक ?

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रीय गुप्तचर तपास यंत्रणा म्हणजेन एनआयएने देशभरात आज छापेमारी केली असून यात जळगावातील एकाला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

टेरर फंडिंगप्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेशी संबंधित कार्यालय, व्यक्ती आणि महत्वपूर्ण ठिकाणांवर आज पहाटे राष्ट्रीय गुप्तचर तपास यंत्रणा (एनआयए) आणि स्थानिक पोलिसांनी छापे टाकले. हे छापे देशभरात टाकण्यात आले असून महाराष्ट्रात नवी मुंबई, भिवंडी, पुणे, नाशिक, कोल्हापूर, परभणी, औरंगाबाद, नांदेड, बीड, जालना, मालेगावसह आदी ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात एनआयएने एटीएसच्या मदतीने ही कारवाई केली आहे.

या कारवाईत महाराष्ट्रातून २० जणांना अटक करण्यात आल्याची माहिती एनआयएने दिली आहे. तसेच, छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणात महत्त्वपूर्ण कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक डाटा जप्त करण्यात येत आहे. तर या छाप्यात जळगाव येथील एकाला देखील अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. तथापि, एनआयए अथवा एटीएसने या प्रकरणी अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.

Protected Content