Crime : आसोदा येथे जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा; दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील आसोदा गावात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने छापा टाकून सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे तर अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील आसोदा आव्हाने रोडवर असलेल्या वीटभट्टीजवळ काही व्यक्ती झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलिस अधिक्षक कुमार चिंथा यांना रविवारी २४ एप्रिल रोजी सायंकाळी मिळाली. त्यानुसार कुमार चिंथा यांनी कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार, पोलीस नाईक रवींद्र मोतीराया, पो.कॉ. अशोक फुसे, पो.कॉ. आकाश शिंपी, आकाश माळी, संतोष जाधव, जीवन जाधव, रवींद्र कारकळ ज्ञानेश्वर कोडी असे पथक रवाना झाले. रात्री ९ वाजता पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांना पाहून सहा ते सात जण पसार झाले. यातील अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले आहे.

 

या कारवाईमध्ये पोलिसांनी २ हजार ५०० रूपयांची रोकड, (एमएच १९ डीडब्ल्यू ९६४९, एमएच १९ के २८५२, एमएच १९सीटी ९२, एमएच १९ डीएच ५०, एमएच २१ एवाय ६०७४ आणि एमएच १९ एझेड ७८८४) क्रमांकाच्या सहा दुचाकी असा एकूण १ लाख ५७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस नाईक ज्ञानेश्वर काळी यांच्या फिर्यादीवरून जितेंद्र उर्फ रवी बाबुराव देशमुख, पद्माकर पुरुषोत्‍तम कोळी दोघे रा. असोदा ता.जळगाव आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा या तीन जणांविरोधात जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content