चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील भोरस बुद्रुक येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीसांनी छापा टाकून साडेसहा हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. जुगार खेळणाऱ्या १० जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असतांना तालुक्यातील भोरस बुद्रुक येथे बेकायदेशीर जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती ग्रामीण पोलीसांनी मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी गुरूवारी रात्री १० वाजता पथकाला रवाना केले. गावातील रिक्षास्टॉपच्या पाठीमागे असलेल्या अवैध सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीसांनी छापा टाकून रावसाहेब वाल्मिक पाटील, रामदास वामन पाटील, शंकर सुरेश खैरनार, संदिप अण्णा मोरे, वसंत बारकू पाटील, सुल्तान मस्ताज सैय्यद, रियाज शेख सवौद्दीन, कृष्णा भगवान पवार, गोरखनाथ सुरेश जगताप व किरण देवीदास साळूंके सर्व रा. भोरस ब्रु. ता. चाळीसगाव यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांच्या ताब्यातून ६ हजार ५८० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
यांनी केली कारवाई
पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली युवराज नाईक, शांताराम पवार, भुपेश वंजारी, दत्तु महाजन, जयवंत सपकाळे, प्रेमसिंग राठोड व नितेश पाटील यांनी केली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास बिभिषण सांगळे हे करीत आहेत.