Home क्रीडा पोलीस नाईक रवींद्र वंजारी यांना राष्ट्रीय स्पर्धेत कास्य

पोलीस नाईक रवींद्र वंजारी यांना राष्ट्रीय स्पर्धेत कास्य

0
45

WhatsApp Image 2019 04 04 at 4.36.56 PM

जळगाव (प्रतिनिधी ) अखिल भारतीय शरीर सौष्ठव पोलीस स्पर्धेत जळगाव जिल्हा पोलीस दलातील पोलीस नाईक रवींद्र वंजारी यांनी कास्य पदक प्राप्त केले. ही स्पर्धा नुकतीच जयपूर राजस्थान येथे आयोजित करण्यात आली होती. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचा पोलीस दलातर्फे गौरव करण्यात आला.

 

रवींद्र वंजारी यांनी ६७ व्या अखिल भारतीय शरीर सौष्ठव पोलीस स्पर्धेत  ८० किलो वजनी गटात सहभाग घेऊन कास्य पदक प्राप्त केले. वंजारी यांनी यापूर्वी ही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेऊन जिल्हा पोलीस दलाचे नाव लौकीक मिळवून दिला आहे. याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी त्यांचा गौरव केला. याप्रसंगी पोलीस उपअधीक्षक गृह केशव पातोंड, पोलीस निरीक्षक बापू रोहम, रापोनी सुभाष कावरे, वेल्फेअरचे सहा. निरीक्षक संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound