करगावतांडा गावात गुलाबराव देवकरांनी केले परिवर्तनाचे आवाहन

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील करगावतांडा या गावात आज महाआघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून जळगाव मतदारसंघात परिवर्तन करण्याचे आवाहन केले.

राष्ट्रवादी, काँग्रेस तसेच रिपाइं (कवाडे गट) महाआघाडीतर्फे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असणार्‍या माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी चाळीसगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. या अनुषंगाने करगावतांडा येथील बैठकीत त्यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघात परिवर्तन करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, या मतदारसंघातून सातत्याने भाजपचा उमेदवार विजयी होत असून केंद्र व राज्यातही याच पक्षाचे सरकार आहे. मात्र त्यांच्या गैर कारभाराला जनता कंटाळली असून आता मुजोर सत्ताधार्‍यांना धडा शिकवण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. त्यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघातून आपल्याला विजयी करण्याचे आवाहन केले.

या प्रचार दौर्‍यात गुलाबराव देवकर यांच्या सोबत पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष श्याम देशमुख, महानंदाचे संचालक प्रमोद बापू पाटील, जिल्हा परिषद गटनेते शशिभाऊ साळुंखे, जि.प. सदस्य भूषण पाटील, डॉ.शहाजीराव देशमुख, मंगेश पाटील,भगवान बापू पाटील, रामचंद्र जाधव, मिलिंद जाधव, कॉग्रेसचे नेते अशोक खलाणे, अनिल निकम, अ‍ॅड. प्रदिप आहिरराव ,योगेश पाटील, रिपाई कवाडे गटाचे कालिदास आहिरे, मालू आप्पा यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Add Comment

Protected Content