जिल्ह्यातील चौघांना पोलिस महासंचालक पदक जाहीर

0
22


जळगाव प्रतिनिधी । उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील एक पोलिस उपअधिक्षक, एक उपनिरीक्षक व २ हेडकॉन्स्टेबल अशा चार जणांना पोलीस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
पोलिस महासंचालक जायसवाल यांनी पोलिस महासंचालक पदक जाहीर झालेल्या कर्मचार्‍यांबाबतचे आदेश काढले. यात जिल्ह्यातील भुसावळ येथील पोलिस उपअधीक्षक गजानन तुळशीराम राठोड, पोलिस उपनिरीक्षक युवराज मोतीराम पाटील (जळगाव), पोलिस हवालदार देवेंद्र मोतीराम दाणीर व शहर पोलिस ठाण्याचे संजय एकनाथ शेलार यांचा समावेश आहे.

पोलीस महासंचालक पदक जाहीर झालेल्या चारही मान्यवरांना महाराष्ट्र दिनी सन्मानित करण्यात येणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here