जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील 126 पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली आहे. यात 37 पोलीस हवालदार यांची सहाय्यक पोलीस उप निरीक्षकपदी, 44 पोलीस नाईकांची पोलीस हवालदारपदी तर 45 पोलीस शिपाईंची पोलीस नाईकपदी पदोन्नती देण्यात आले आहे. असे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी नुकतेच काढले आहे. जळगाव जिल्ह्यातील 126 पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असून यात 63 जणांना ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आली. तर उर्वरित पोलीस कर्मचाऱ्यांना खुला प्रवर्गातून पदोन्नती देण्यात आले आहे.
