पोलीस निरीक्षकांनी बालगृहात साजरा केला वाढदिवस

एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक स्वप्नील उनवणे यांनी खडके बु. ता.एरंडोल येथिल अनाथ निराधार मुला मुलींच्या बालगृहात अतिशय साधेपणाने वाढदिवस साजरा केला.

याप्रसंगी बालगृहातील बालक आणि बालीका यांनी त्यांचे औक्षण करून शुभेच्छा दिल्या. नंतर बालकांना आवडणारे मिष्टान्न भोजन देण्यात आले .यावेळी उनवणे यांनी सर्व बालकांशी संवाद साधला त्यांची आस्थेवाईक पणे विचारणा केली व कोविड-१९ च्या प्रदुर्भावाविषयी मार्गदर्शन केले.

नियमीत हँडवॉश, सॅनिटायझर, मास्क चा वापर करा आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा असे मार्गदर्शन केले. सामाजिक जाणिव असल्यामुळे मुलांसाठीचा अतिशय प्रेरणादायी उपक्रम असल्याने मानसिक समाधान मिळल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी त्यांच्या पत्नी भावना उनवणे, मुलगी स्वाभिनी उनवणे, शोभाताई गायकवाड, संघरत्न गायकवाड, पो.कॉ. श्रीराम पाटील, अकिल मुजावर, रविंद्र सपकाळे उपस्थित होते.

याप्रसंगी संस्थाध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी अधिक्षक मधुकर कपाटे, तुषार अहिरे, गणेश पंडीत, ॠषीकेश ठाकरे, अरुणा पंडीत,  कासुबाई चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

Protected Content