यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दहीगाव येथील तीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीला आला होता. या गुन्ह्यात २५ वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली होती. आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील दहिगाव राहणारा कैलास प्रल्हाद पाटील (वय-२५) याने दारूच्या नशेत शुक्रवारी ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास आपल्याच घरात भाडेकरू म्हणुन राहात असलेल्या शेतमजुर यांच्या साडेतीन वर्षाच्या मुलीला १० रुपये देण्याचे आमीष दाखवुन घरात नेले व तिच्यावर अत्याचार केले. बालिकेची आई ही कामावरून घरी आल्यावर तिला बालीकेने आईस झालेल्या प्रकाराची माहीती दिल्यावर सदरचा प्रकार लक्षात आला. संतप्त झालेल्या आईने त्या घरमालकाच्या मुलाच्या कानशिलात लगावली असता त्याने घटनास्थळाहून पळ काढला. पिडीत मुलीच्या आईने काल शनिवारी ९ ऑक्टोबर रोजी यावल पोलीसात तक्रार दाखल केल्यावर संशयीत आरोपी कैलास पाटील यास पोलीसांनी अटक केली. आज रविवारी १० ऑक्टोबर रोजी संशयित आरोपला भुसावळ न्यायालयात हजर केले असता न्या.एस .पी. डोरले यांनी आरोपीस दोन दिवसाची १२ ऑक्टोबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.