जामनेरात जैन संघटनांतर्फे शासकीय योजनांसदर्भात मार्गदर्शन शिबीर

जामनेर प्रतिनिधी । जैन सोशल गृप, भारतीय जैन संघटना, भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या वतीने आज जामनेरात सवर्ण आरक्षण योजना,  अल्पसंख्याक छात्रवती योजना व पंतप्रधान स्वयंरोजगार मुद्रा ऋण योजना संदर्भा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबीरात एसबीआय बँकेचे व्यवस्थापक आशुतोष कुमार, मयूर पोरवाल, एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक रुपेश नाईक आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मुद्रालोन संदर्भात माहिती देण्यात आली. युथ एज्युकेशन चे अध्यक्ष नितीन सुराणा यांनी सरकार तर्फे विध्यार्थ्यां साठी राबवान्यात  येणाऱ्या सवर्ण आरक्षण योजना ईडब्ल्यू एस व अल्पसंख्यांक शिष्यवृती माहिती दिली. याबाबत अधिकाधिक पाल्य व विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन केले.  याप्रसंगी सनी डांगी, सुमित मुनोत, प्रफुल लुंकड, निलेश भुरट, विजेंद्र सैतवाल यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

Protected Content