यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगाव येथे राहणारा एक १२ वर्ष वयाचा मुलगा अचानक घरी निघुन गेल्याने कुटुंबाने त्यास कुणीतरी अज्ञात व्याक्ती फुसलावुन पळवुन नेल्याची तक्रार दाखल केली होती. पोलीसानी या घटनेची दखल घेत त्या घर सोड्डन गेलेल्या तरुणाचा शोध लावण्यात यश मिळवले आहे.
यावल तालुक्यातील दहीगाव येथील राहणारे शशीकांत शिवाजी महाजन यांचा १२ वर्ष वयाचा डेविड महाजन नांवाचा मुलगा ३० सप्टेंबर रोजी आपल्या घरून आई वडील शेतात कामास गेले असता कुणास काही एक न सांगता निघुन गेला. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला असता तो मिळुन न आल्याने अखेर हरवलेल्या मुलाच्या वडिलांनी १ ऑक्टोबर रोजी यावल पोलिस ठाण्यात कुणीतरी अज्ञात व्यक्ती आपल्या मुलास फुसलावुन पळवुन नेल्याची तक्रार दाखल केली होती.
या अनुषंगाने यावलचे पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, पोलीस नाईक राजेन्द्र पवार यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवुन फिर्याद दाखल झाल्याच्या अवघ्या दोन तासातच भुसावळच्या रेल्वे स्थानकावरच्या प्लेट फार्म क्रमांक ३ वर शोध घेत असता सदरील मुलगा सिसिटीव्हीच्या मदतीने डेविड हा भुसावळ रेल्वे स्थानकाच्या टीकीट खिडकी जवळ मिळवुन आला , हरवलेल्या मुलास सुखरूप पोलिसानी त्यास वडील शशीकांत महाजन यांच्या स्वाधीन केले.