Home क्राईम गोळीबार करणार्‍याला पोलिस कोठडी

गोळीबार करणार्‍याला पोलिस कोठडी

0
33


धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पिंप्री येथे आजोबाच्या अंत्ययात्रेत गोळीबार करून एकाचा जीव घेणार्‍या तरूणास दोन दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली.

याबाबत वृत्त असे की, पिंप्री येथे आजोबाच्या अंत्यसंस्कारावेळी दिनेश विठ्ठल बडगुजर याने हवेत गोळीबार केला असता तुकाराम वना बडगुजर या वृद्धाचा छातीला लागून त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी गोळी झाडणारा दिनेश विठ्ठल बडगुजर याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या जवळील पिस्तूल ही बेकायदेशीर असल्याच्या निदर्शनास आले असून जप्त करण्यात आली आहे. आरोपीस रविवारी धरणगाव न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अंबादास मोरे हे करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound