Home ADVERTORIAL घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर पोलीसांची धडक कारवाई; ३४ गॅस सिलेंडर जप्त

घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर पोलीसांची धडक कारवाई; ३४ गॅस सिलेंडर जप्त

0
141

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील फातेमा नगरात सुरू असलेल्या अवैध गॅस भरणा केंद्रावर एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी १४ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता छापा टाकला. भरवस्तीत घरातच सुरू असलेला कारखाना उध्वस्त करीत पोलिसांनी ३४ व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले आहेत.

जळगाव शहरातील इच्छादेवी चौकाजवळ महामार्गलगत एका अवैध गॅस भरणा केंद्रावर वाहनात गॅस भरणा करताना स्फोट झाला होता. घटनेत ७ नागरिकांना जीव गमवावा लागल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. घटनेनंतर शहरातील सर्वच अवैध गॅस भरणा केंद्र बंद होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांची बदली करून संदीप पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील फातेमा नगर परिसरात एका घरात अवैधरित्या गॅस पंप सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून छापा टाकला असता शोएब शेख शफी वय-२०, रा.फातेमा नगर याला ताब्यात घेतले. घराची झडती घेतली असता हॉल, किचन, शौचालयातून २० घरगुती आणि १४ व्यावसायिक गॅस सिलेंडर पोलिसांनी जप्त केले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


Protected Content

Play sound