यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील डोंगरकठोरा येथे सट्टा जुगार अड्ड्यासह अवैध गावठी दारू तयार करणाऱ्यांविरोधात यावल पोलीसांनी बुधवारी १३ एप्रिल रोजी धडक कारवाई करून पाच ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेतले असून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथे जुगार अड्डा आणि अवैधरित्या गावठी हातभट्टी सुरू असल्याची गोपनिय माहिती यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशित कांबळे यांना बुधवारी १३ एप्रिल रोजी मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार असलम खान, पोहेकॉ सुशील घुगे, राहुल चौधरी, राजेश वाडे धडक कारवाई करत गावठी हातभट्टीची दारू नष्ट करण्यात आली आहे.
या कारवाईत संतोष भीमराव सपकाळे याचे कडून ७५० रुपये किमतीची १५ लिटर गावठी दारू, सुभाष त्र्यंबक काळे यांचेकडील ४५० रुपये किमतीची ९ लिटर दारू जप्त करत ताब्यात घेतले आहे. तर बसस्थानक परिसारात सट्टा जुगार चालविणारे दिलीप भास्कर पाटील, अरविंद सुरेश पाटील आणि अशोक वामन कोळी यांना ताब्यात घेवून यांच्याकडून रोकडसह जुगाराची साधने हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.का. संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी हे करीत आहेत.