जुगार अड्डयावर छापा; राजकीय मंडळींना अटक

शेअर करा !

पाळधी, ता. धरणगाव प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या सावदा-रिंगणगाव रस्त्यावरील जुगार अड्डयावर विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या पथकाने टाकलेल्या धाडीत जळगावातील काही राजकीय मंडळींना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे.

याबाबत वृत्त असे की, सावदा-रिंगणगाव रस्त्यावर जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरिक्षकांना मिळाली होती. त्यांच्या निर्देशानुसार पथकाची निर्मिती करण्यात आली. या पथकाने रात्री साडेआठच्या सुमारास येथे छापा मारला.

या कारवाईत २२ जणांना अटक करण्यात आली असून यात जळगावातील काही माजी नगरसेवकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकचे परिविक्षाधीन डीवायएसपी गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली. यातील संशयितांवर रात्री उशीरापर्यंत कारवाई सुरू होती.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!