घरफोडीतील अट्टल चोरट्यास पोलिसांनी केली अटक

जळगाव प्रतिनिधी । खालच्या मजल्यावर कुटुंबिय झोपलेले असताना चोरट्यांनी वरच्या मजल्यावरील बंद खोलीत प्रवेश करुन २५ हजार रुपयांची रोकड लांबवली. १० जानेवारी रोजी रात्री तांबापुरात ही घटना घडली होती. या गुन्ह्यातील अट्टल चोरट्यास एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी अटक केली.

फिरोज शेख इकबाल शेख (वय २२, रा. बिसमिल्ला चौक, तांबापुरा) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याने गल्लीतच राहणाऱ्या मोहसीन शेख सलीम (वय २४, रा. बिसमिल्ला चौक, तांबापुरा) यांच्या घरात ही चोरी केली होती. यानंतर फिराजे या परिसरातून निघून गेला होता. त्याच्यामुळे पोलिसांचा संशय त्याच्यावर बळावला होता. दरम्यान, रविवारी सायंकाळह फिराजे जळगावात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रतापसिंह शिकारे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, आनंदसिंग पाटील, सुधीर साळवे, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील यांच्या पथकाने अजिंठा चौफुली येथून ताब्यात घेतले. तो थोड्या भुसावळ येथे जाण्याच्या तयारीत असताना त्यास ताब्यात घेतले. त्याला अटक करुन सोमवारी न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. जितेंद्र राजपूत तपास करीत आहेत.

 

Protected Content