विष घेतलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वराडसीम २१ वर्षीय तरुणाने विषारी औषध घेतल्या कारणामुळे उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुरुवार २५ जानेवारी रोजी पहाटे २ वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हर्षल ज्ञानेश्वर चौधरी वय-२१, रा. वराडसीम ता. भुसावळ असे माहीत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक अशी की, हर्षल चौधरी हा आपल्या परिवारासह भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथे वास्तव्याला होता. २३ जानेवारी रोजी त्याने घरी असताना काहीतरी विषारी औषध सेवन केले होते. त्यामुळे त्याचे प्रकृती खालावली होती. त्याला तातडीने नातेवाईकांनी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू असताना गुरुवार २५ जानेवारी रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यावेळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेबाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक कैलास बाविस्कर हे करीत आहे.

Protected Content